ग्रामपंचायत करमाळे
गावाचा इतिहास.
करमाळे : इतिहास, भूगोल आणि संस्कृती.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेले करमाळे हे एक लहानसे गाव आहे. शिराळा तालुक्यातील उत्तर भागातील एक महत्त्वाचे गाव आहे .महाराष्ट्र राज्य स्थापनेपूर्वी हे गाव दक्षिण सातारा जिल्ह्यात होते. सध्या सांगली जिल्ह्यातील पश्चिम भागात येते.समुद्र सपाटीपासून गावची उंची ७०० ते ८०० मी आहे. गावाला सर्व बाजूंनी डोंगरांनी वेढलेले असून,यापैकीच एका टेकडीवर लोकवस्ती आहे.सह्याद्रिच्या घाटमाथ्यावर असल्याने पावसाचे प्रमाण जास्त आहे.सरासरी १०० सेंटीमीटर पाऊस पडतो. गावातील महादेव डोंगरात तीळगंगा ही हंगामी नदी उगम पावते आणि बहे ता. वाळवा येथे कृष्णा नदिला जाऊन मिळते. गावाभोवतीच्या डोगरांगांमुळे वारणा आणि कृष्णा खोरे वेगळे झालेले आहे. अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य लाभलेले हे गाव जैवविविधतेने समृद्ध आहे.
संस्कृती
साधारण ४०० वर्षांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी ता .भूदरगड येथून काही लोक करमाळे येथे स्थलांतरित झाले.येथील ग्रामदैवत जोतिबा हे कुलदैवत आहे.
सर्व समाजाचे लोक गावात वास्तव्यास आहेत.त्यातील बहुसंख्येने
शेतकरी आहेत.गावात परंपरा म्हणून बारा बलुतेदार पद्धत अजूनही टिकून आहे. सर्वच सण इथे पारंपारिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. गूढी पाडवा, बेंदूर, नागपंचमी, गणेशोत्सव,
दसरा, दिवाळी आणि संक्रांत हे प्रमुख सण साजरे करतात.गुढी पाडव्याच्या नंतरच्या दुसऱ्या दिवशी गावची जत्रा भरते. जत्रेत बैलगाडा शर्यत आणि कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या जातात.ग्रामदैवत हनुमान मंदीर परिसरात रात्री छबीना , तमाशा आणि नाटक असा भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम असतो.
गावातील लोकांनी जय हनुमान वारकरी भजनी मंडळ आणि संत ज्ञानेश्वर पारायण मंडळाच्या माध्यमातून भक्ती चळवळ उभी केली आहे. सोंगी भारूड
करणारे कलाकार सुद्धा गावात असून, मनोरंजनाच्या आधुनिक साधनांमुळे सध्या ते मागे पडले आहे. गावातील नवीन पिढी सोंगी भजन पुनर्जीवित करण्यासाठी धडपडत आहे.
लेझीम, दांडपट्टा, तुतारी ,हलगी अशी पारंपरिक वाद्ये वाजवणारे कलाकारदेखील आहेत. प्रामुख्याने त्यांनी वंशपरंपरेने ही कला जपली आहे. कुस्ती, कबड्डी हे खेळ प्रामुख्याने खेळले जातात. याबरोबरच खोखो, क्रिकेटसाखे खेळ खेळले जातात.
पीकपद्धती
शेती हा येथील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे.
पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली कोरडवाहू शेती केली जाते. भात हे येथील मुख्य पीक आहे.याबरोबरच भूईमूग, खरपा मका, जोंधळा, संकरित ज्वारी, सोयाबीन अशी विविध पिके घेतली जातात. धूळवाफेवरील वैशिष्ट्यपूर्ण भातशेती इथे केली जाते. शिराळी मोठ्ठं, इंद्रायणी या भाताच्या जाती प्रसिद्ध आहेत. देशी पावटा चवीला उत्तम आहे. इथल्या डोंगरात येणारे शेडा गवत जगण्याचा आधार आहे. वैरण मुबलक असल्याने दूध व्यवसाय केला जातो. इथले शेतकरी म्हैशीचे उत्तम प्रतीचे दूध उत्पादित करतात. या दूधाला शहरात चांगली मागणी आहे. शर्यतीसाठी आणि शेतीसाठी खिल्लार बैल पाळतात. शिवाय शेळी - कोंबडी पालन पारंपारिक पद्धतीने केले जाते.
शिक्षण
गावात पुर्व प्राथमिक , प्राथमिक आणि माध्यमिक शाळा असून उच्च शिक्षणासाठी जवळच्या शहरात जावे लागते. कराड, ईश्वरपूर , शिराळा, सांगली आणि कोल्हापूर या शहरात पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी जात असतात.
गावातील बहुसंख्य लोक नोकरी धंद्याच्या निमित्ताने मुंबई या महानगरात स्थलांतरित झाले आहेत. ते फळ आणि भाजी बाजारात माथाडी कामगार आहेत. याशिवाय काही लोक सरकारी आणि खासगी कंपनीत काम करतात.
जेमतेम प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण घेतलेले लोक अधिक आहेत. उच्च शिक्षण घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. पोलिस आणि सैन्य दलात युवक मोठ्या संख्येने भरती होत असतात. इतर क्षेत्रात तुलनेत कमी लोक आहेत.
आर्थिक स्थिती
शेती आणि पशूपालन हे प्रमुख उत्पन्नाचे स्त्रोत आहेत. शेती ही प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने हंगामी बेकारीची परिस्थिती असते.अशावेळी शेतीतील कामे झाल्यावर लोक माथाडी कामगार म्हणून मुंबई महानगरात जातात. शिराळा औद्योगिक वसाहत आणि राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना यामुळे काही प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे.गावात महिला बचत गट आणि शेतकरी स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून अल्पकालीन आर्थिक गरजा भागविल्या जातात. मोठ्या प्रमाणावर सरकरी मदतीवर अवलंबून रहावे लागते.
पंचायत संरचना (सरपंच, उपसरपंच, सदस्य).
भूमिका व जबाबदाऱ्या - कोण काय करते.
ग्रामपंचायत – भूमिका व जबाबदाऱ्या (मराठी)
१. सरपंच
भूमिका: ग्रामपंचायतीचे प्रमुख
जबाबदाऱ्या:
-
ग्रामपंचायत व ग्रामसभेच्या बैठका घेणे
-
शासकीय योजना गावात राबविणे
-
गावातील शांतता व सुव्यवस्था राखणे
-
विकासकामांवर देखरेख ठेवणे
-
उच्चस्तरीय प्रशासनासमोर गावाचे प्रतिनिधित्व करणे
२. उपसरपंच
भूमिका: सरपंचांचे सहाय्यक
जबाबदाऱ्या:
-
सरपंच अनुपस्थितीत काम पाहणे
-
प्रशासन व विकासकामात सहकार्य करणे
-
सदस्य व ग्रामस्थांमध्ये समन्वय राखणे
३. ग्रामपंचायत सदस्य (पंच)
भूमिका: लोकप्रतिनिधी
जबाबदाऱ्या:
-
बैठकीत सहभागी होणे व निर्णय घेणे
-
गावाच्या समस्या मांडणे
-
योजनांची अंमलबजावणी तपासणे
-
जनकल्याणाची जबाबदारी घेणे
४. ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी
भूमिका: प्रशासकीय अधिकारी
जबाबदाऱ्या:
-
नोंदी, खाते व दप्तर सांभाळणे
-
अहवाल व प्रस्ताव तयार करणे
-
योजनांची अंमलबजावणी करणे
-
शासन व ग्रामपंचायत यांमधील दुवा म्हणून काम करणे
५. ग्रामसभा
भूमिका: गावातील सर्व मतदारांची सभा
जबाबदाऱ्या:
-
वार्षिक अंदाजपत्रक व विकास आराखडा मंजूर करणे
-
ग्रामपंचायतीच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे
-
पारदर्शकता व उत्तरदायित्व राखणे
६. स्थायी समित्या
भूमिका: विषयवार समित्या
जबाबदाऱ्या:
-
आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता, वित्त
-
नियोजन व अंमलबजावणीवर देखरेख
७. महिला व बालकल्याण समिती
जबाबदाऱ्या:
-
महिलांचे सक्षमीकरण
-
बालकांचे आरोग्य, पोषण व शिक्षण
-
शासकीय योजनांची अंमलबजावणी
८. वित्त व नियोजन समिती
जबाबदाऱ्या:
-
आर्थिक नियोजन व अंदाजपत्रक
-
कर व महसूल संकलन
-
खर्च व लेखापरीक्षणावर नियंत्रण
मुख्य संपर्क क्रमांक / आपत्कालीन संपर्क: आरोग्य केंद्र, पोलीस, रुग्णवाहिका, रक्तपेढी, अग्निशमन, आपत्ती व्यवस्थापन विभाग, FPO गट, MSEB विभाग, वन विभाग इत्यादी.
दृष्टीकोन, ध्येय आणि मूलभूत मूल्ये.
समृद्ध गाव, हरित गाव, संपन्न गाव!
आर्थिक स्वयंपुर्णता आणि शाश्वत विकास!